मार्क 9:11-13
मार्क 9:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?” तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे? मी तुम्हास सांगतो, एलीया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले.”
मार्क 9:11-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?” येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. पण मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावीत आणि तुच्छ मानले जावे असे कशाला लिहिले आहे? पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आलेला आहे आणि त्याच्याविषयी जसे लिहून ठेवले आहे, त्यानुसार त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.”
मार्क 9:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलीया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे?” त्याने त्यांना उत्तर दिले, “एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय? तथापि मी तुम्हांला सांगतो, एलीया तर आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले.”
मार्क 9:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?” त्याने त्यांना उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे, तरीदेखील मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावीत व त्याचा अव्हेर केला जावा, असे त्याच्याविषयी लिहिले आहे, त्याचा अर्थ काय? तरी पण मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आला आहे आणि लोकांना जसे वाटले तसे त्यांनी त्याचे केले, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.”