मार्क 8:37-38
मार्क 8:37-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
मार्क 8:37-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का? ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या गौरवात व पवित्र देवदूतांच्या समवेत परत येईन तेव्हा लाज वाटेल.”
मार्क 8:37-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.”
मार्क 8:37-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल? ह्या विश्वासहीन व दुष्ट पिढीत ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो पवित्र देवदूतांसह त्याच्या पित्याच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल.”