YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 4:35-41

मार्क 4:35-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यादिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो तारवात होता तसेच ते त्यास घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते. तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?” मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?” परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण?

सामायिक करा
मार्क 4 वाचा

मार्क 4:35-41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली. येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?” मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला धमकाविले व लाटांना, “शांत हो” असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले. त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?” शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?”

सामायिक करा
मार्क 4 वाचा

मार्क 4:35-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता; तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?” तेव्हा त्याने उठून वार्‍याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?” तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.”

सामायिक करा
मार्क 4 वाचा

मार्क 4:35-41 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ या.” शिष्यांनी लोकसमुदायाचा निरोप घेतला व ज्या मचव्यात येशू बसला होता, तेथे जाऊन ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्यांच्याबरोबर होते. अचानक तेथे मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळू लागल्या की, तो पाण्याने भरू लागला. मात्र येशू मचव्याच्या मागच्या बाजूला उशीवर डोके ठेवून झोपला होता. ते त्याला जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपल्याला काळजी वाटत नाही काय?” त्याने उठून उभे राहून वाऱ्याला हुकूम सोडला, “निवांत हो!” आणि लाटांना म्हटले, “शांत व्हा!” वारा पडला व अगदी निवांत झाले. त्यानंतर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्ही अजून विश्‍वास ठेवत नाही काय?” ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.”

सामायिक करा
मार्क 4 वाचा