मार्क 16:15-18
मार्क 16:15-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”

मार्क 16:15-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते त्यांना म्हणाले, “सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा. जे विश्वास ठेवतील आणि बाप्तिस्मा घेतील, त्यांचे तारण होईल. पण जे विश्वास ठेवण्यास नकार देतील, ते दंडास पात्र ठरतील. आणि विश्वास ठेवणार्याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते काढतील आणि नव्या भाषा बोलतील. ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.”
मार्क 16:15-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणार्यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”
मार्क 16:15-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन सर्व लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही त्याला दोषी ठरवण्यात येईल. विश्वास धरणाऱ्यांना ही चिन्हे करता येतील:ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या भाषा बोलतील; सर्प उचलतील, ते कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधा होणार नाही व त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”