मार्क 12:43-44
मार्क 12:43-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
मार्क 12:43-44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते पाहून येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या गरीब विधवेने दान पात्रात इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या संपत्तीतून थोडेसे दिले, पण हिने तर आपल्या गरिबीतून सर्व देऊन टाकले—जी तिची उपजीविका होती.”
मार्क 12:43-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले; परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.”
मार्क 12:43-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावून म्हटले, “मी तुम्हांला सत्य सांगतो, हे जे दान टाकत आहेत, त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी त्यांच्या विपुलतेतून टाकले. परंतु हिने, तिच्याकडे उपजीविकेसाठी जे होते, ते सर्व टाकले.”