मीखा 7:7-8
मीखा 7:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतू मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावीन, मी आपल्या तारणाऱ्या देवाची वाट पाहीन, माझा परमेश्वर माझे ऐकेल. माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.
सामायिक करा
मीखा 7 वाचामीखा 7:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील. अरे माझ्या वैर्या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस! कारण मी पडलो, तरी पुन्हा उठेन. जरी मी अंधारात बसलो, तरी याहवेह माझा प्रकाश होतील.
सामायिक करा
मीखा 7 वाचामीखा 7:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल. अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल.
सामायिक करा
मीखा 7 वाचा