मत्तय 9:36-38
मत्तय 9:36-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
मत्तय 9:36-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी समुहाला पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून त्यांना विनंती करा.”
मत्तय 9:36-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”
मत्तय 9:36-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोकसमुदायाला पाहून त्याचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक गांजलेले व पांगलेले होते. नंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत ह्याकरिता त्याच्याकडे प्रार्थना करा.”