मत्तय 9:21-22
मत्तय 9:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.” तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
सामायिक करा
मत्तय 9 वाचामत्तय 9:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.” येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.
सामायिक करा
मत्तय 9 वाचामत्तय 9:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.” तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.
सामायिक करा
मत्तय 9 वाचा