मत्तय 8:26-27
मत्तय 8:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
मत्तय 8:26-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले. ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!”
मत्तय 8:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात?” मग उठून त्याने वारे व समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!”
मत्तय 8:26-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?”