YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:15-23

मत्तय 7:15-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. त्यांच्या फळांवरुन तुम्ही त्यांस ओळखाल. काटेरी झाडाला द्राक्षे लागतात काय? किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येताच काय? त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल. मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:15-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात. त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येते. लोक कधी काटेरी झुडपांवरून अंजीर किंवा रानगुलाबाच्या झुडपांवरून द्राक्षे काढतात काय? प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते. चांगली झाडे वाईट फळे देणार नाहीत आणि वाईट झाडे चांगली फळे देणार नाही. या कारणामुळे चांगली फळे न देणारी झाडे तोडून टाकण्यात येतील व जाळून टाकली जातील. अशाप्रकारे त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येईल. “जो कोणी मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल. त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील, ‘प्रभूजी, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भविष्यवाणी केली नाही काय, तुमच्या नावाने भुते घालविली नाहीत काय, तुमच्या नावाने मोठे चमत्कार केले नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:15-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.’

सामायिक करा
मत्तय 7 वाचा

मत्तय 7:15-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. ‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील. न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’

सामायिक करा
मत्तय 7 वाचा