मत्तय 7:12-14
मत्तय 7:12-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे. अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.
मत्तय 7:12-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर मग जे सर्व इतरांनी तुमच्यासाठी करावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा. नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे. “अरुंद दाराने प्रवेश करा, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात. तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.
मत्तय 7:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्टग्रंथ ह्यांचे सार हेच आहे. अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.
मत्तय 7:12-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोकांनी तुमच्याशी जसे वागावे अशी तुमची इच्छा असेल, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच शिकवतात. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो.