मत्तय 5:13-16
मत्तय 5:13-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील. तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही. आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
मत्तय 5:13-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा परत कशाने आणू शकता? ते बाहेर टाकून दिले पाहिजे व असे मीठ पायदळी तुडविण्याच्या लायकीचे आहे. “तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही. त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही. त्याऐवजी, दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.
मत्तय 5:13-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
मत्तय 5:13-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? ते मीठ बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा पेटवून तो मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.