मत्तय 4:18-20
मत्तय 4:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.
मत्तय 4:18-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.” लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
मत्तय 4:18-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.
मत्तय 4:18-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू गालील समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले. कारण ते कोळी होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले.