मजकुराकडे जा

मत्तय 3:2-3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 3:2-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.”

मत्तय 3 MARVBSI

मत्तय 3:2-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” कारण यशया संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्याचविषयी असे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली; ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा सरळ करा.’”

मत्तय 3 IRVMAR

मत्तय 3:2-3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” त्याच्याविषयी यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते: अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’

मत्तय 3 MACLBSI

मत्तय 3:2-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

व म्हणाला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशायाह बोलला होता: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”

मत्तय 3 MRCV