मत्तय 26:40-41
मत्तय 26:40-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.”
मत्तय 26:40-41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “तुम्ही माणसे एक तासभरही माझ्याबरोबर जागे राहू शकला नाही का? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”
मत्तय 26:40-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.”
मत्तय 26:40-41 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत, असे पाहून पेत्राला म्हणाला, “काय, घटकाभरही तुम्हांला माझ्याबरोबर जागे राहवले नाही काय? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.”
