मत्तय 26:14-16
मत्तय 26:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली. तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
मत्तय 26:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदाह इस्कर्योत; महायाजकांकडे गेला. आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली. त्या वेळेपासून यहूदाह येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
मत्तय 26:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’ तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला.
मत्तय 26:14-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर बारा जणांपैकी एक, यहुदा इस्कर्योत, मुख्य याजकांकडे गेला आणि त्याने विचारले, “मी येशूला धरून दिले तर मला काय द्याल?” त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली. तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला.