मत्तय 25:6-10
मत्तय 25:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा! सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. पण शहाण्यांनी उत्तर देऊन म्हणले; ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या. त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला.
मत्तय 25:6-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली. “मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले. मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’ “त्यांनी उत्तर दिले, ‘नाही, ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्यांकडे जा आणि स्वतःसाठी विकत आणा.’ “त्या तेल विकत आणावयास गेल्या. वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला.
मत्तय 25:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्या चला.’ मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’ पण शहाण्यांनी उत्तर दिले की, ‘कदाचित आम्हांला व तुम्हांलाही पुरणार नाही; तुम्ही विकणार्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावे हे बरे.’ त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.
मत्तय 25:6-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मध्यरात्री हाक आली, “पाहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्या जा.’ त्या सर्व मुली उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, “तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून थोडेसे द्या कारण आमचे दिवे मालवू लागले आहेत.’ शहाण्यांनी उत्तर दिले, “नाही. आम्हांला व तुम्हांला पुरेल एवढे तेल आमच्याकडे नाही. तुम्ही स्वतःकरता तेल विकत घेऊन या.’ त्या तेल विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.