मत्तय 25:42-43
मत्तय 25:42-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.
मत्तय 25:42-43 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही खावयास दिले नाही; तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
मत्तय 25:42-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत.’
मत्तय 25:42-43 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले नाही. परका होतो, तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही; आजारी व तुरुंगात होतो, तेव्हा माझ्या भेटीला आला नाही.’