मत्तय 23:37
मत्तय 23:37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“हे, यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती.
मत्तय 23:37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.
मत्तय 23:37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
मत्तय 23:37 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या नगरी, तुझ्याकडे पाठवलेल्यांवर धोंडमार करणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची माझी कितीदा तरी इच्छा होती. पण तू मला तसे करू दिले नाहीस.