YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 22:19-21 - Compare All Versions

मत्तय 22:19-21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?” त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.”

सामायिक करा
मत्तय 22 IRVMAR

मत्तय 22:19-21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले. येशूंनी त्यांना विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?” “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”

सामायिक करा
मत्तय 22 MRCV

मत्तय 22:19-21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक रुपया दिला. त्याने त्यांना म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.”

सामायिक करा
मत्तय 22 MARVBSI

मत्तय 22:19-21 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

कर भरायचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले. तो त्यांना म्हणाला, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.”

सामायिक करा
मत्तय 22 MACLBSI