मत्तय 22:1-4
मत्तय 22:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू त्यांच्याशी पुन्हा एकदा दाखल्यांनी बोलला, त्यास उत्तर देऊन म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला. नंतर राजाने आणखी काही चाकरांना पाठवून दिले, राजा चाकरांना म्हणाला, मी त्या लोकांस अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे, मी माझे चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या.
मत्तय 22:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी परत त्यांना दाखला सांगितला: ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली. ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले. “तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’
मत्तय 22:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला : “स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली; आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले; परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, ‘आमंत्रितांना असे सांगा, पाहा, मी जेवण तयार केले आहे; माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.’
मत्तय 22:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू पुन्हा त्यांना दाखले देऊ लागला. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले. लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावायला त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, आमंत्रितांना असे सांगा, “पाहा, मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत. सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस चला.’