मत्तय 21:38 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 21:38 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु माळी मुलाला पाहून आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला जिवे मारू व ह्याचे वतन घेऊ.’
मत्तय 21:38 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’
मत्तय 21:38 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु मुलाला पाहून कुळे आपसात म्हणाली, “हा तर वारस आहे, चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ.’
मत्तय 21:38 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पण शेतकर्यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’