मत्तय 21:18-19
मत्तय 21:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले.
मत्तय 21:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली. जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फलप्राप्ती होणार नाही.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले.
मत्तय 21:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले.
मत्तय 21:18-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली, म्हणून तो वाटेवर असलेल्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. पण पानांशिवाय त्याला त्यावर काही दिसले नाही. त्याने त्या झाडाला म्हटले, “ह्यापुढे तुला कधी फळ न येवो.” ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले!