मत्तय 18:3-4 - Compare All Versions
मत्तय 18:3-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे.
मत्तय 18:3-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जोपर्यंत तुमच्यात बदल होऊन तुम्ही लहान बालकासारखे होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कधीही तुमचा प्रवेश होणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ होईल.
मत्तय 18:3-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा होय
मत्तय 18:3-4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमचे परिवर्तन होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही. म्हणजेच जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय.