मत्तय 18:15-16
मत्तय 18:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस. पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील
मत्तय 18:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस. जर त्यांनी ऐकले नाही तर, एक किंवा दोन साक्षीदारांना बरोबर घेऊन जा, म्हणजे ‘दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित होईल.’
मत्तय 18:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्तात असताना त्याचा अपराध त्याला दाखव; त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, ‘दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.’
मत्तय 18:15-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुझा भाऊ तुझा अपराधी असेल तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध काय ते त्याला सांग. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास, असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही, तर तू आणखी एका दोघांना आपणाबरोबर घे. अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध व्हावा