YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 14:19-21 - Compare All Versions

मत्तय 14:19-21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच.

सामायिक करा
मत्तय 14 IRVMAR

मत्तय 14:19-21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या. जेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.

सामायिक करा
मत्तय 14 MRCV

मत्तय 14:19-21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते; शिवाय स्त्रिया व मुलेदेखील होतीच.

सामायिक करा
मत्तय 14 MARVBSI

मत्तय 14:19-21 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्याने लोकसमुदायाला गवतावर बसायला सांगितले. नंतर त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या. जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणाऱ्यांमध्ये सुमारे पाच हजार पुरुष होते. शिवाय स्त्रिया व मुले होती, ती निराळीच.

सामायिक करा
मत्तय 14 MACLBSI