मत्तय 13:44-46
मत्तय 13:44-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
मत्तय 13:44-46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“स्वर्गाचे राज्य शेतात दडवून ठेवलेल्या धनासारखे आहे. एका मनुष्याला ते सापडले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपविले आणि अतिशय आनंदाने त्याच्याजवळ होते ते सारे विकून ते शेत विकत घेतले. “पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्यासारखे आहे. त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले.
मत्तय 13:44-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणार्या कोणाएका व्यापार्यासारखे आहे; त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
मत्तय 13:44-46 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. तो एका मनुष्याला सापडतो. तो मनुष्य खजिना पुन्हा लपवून ठेवतो. नंतर तो आनंदाच्या भरात जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. तसेच स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.