मत्तय 13:1-3
मत्तय 13:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला
मत्तय 13:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याच दिवशी येशू घरातून बाहेर पडले आणि सरोवराच्या किनार्यावर बसले. तेव्हा लोकांनी त्यांच्याभोवती इतकी मोठी गर्दी केली, म्हणून ते एका होडीत बसून किनार्यावर उभे असलेल्या लोकांना शिकवू लागले. अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला.
मत्तय 13:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्रकिनार्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
मत्तय 13:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच दिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या काठावर जाऊन बसला. लोकांच्या झुंडी त्याच्याजवळ इतकी गर्दी करू लागल्या की, तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक काठावर उभे राहिले. त्याने त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकविल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला.