YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 10:24-25 - Compare All Versions

मत्तय 10:24-25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही. शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.

सामायिक करा
मत्तय 10 IRVMAR

मत्तय 10:24-25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“शिष्य गुरूपेक्षा थोर नाही, किंवा दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही. शिष्याने आपल्या गुरू सारखे असणे आणि दासाने आपल्या धन्यासारखे असणे पुरे आहे. जर घर प्रमुखाला बालजबूल म्हटले, तर घरच्या सभासदांना कितीतरी अधिक म्हणतील!

सामायिक करा
मत्तय 10 MRCV

मत्तय 10:24-25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

गुरूपेक्षा शिष्य थोर नाही, आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील?

सामायिक करा
मत्तय 10 MARVBSI

मत्तय 10:24-25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

गुरूपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास महान नाही. शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, एवढे पुरे. कुटुंबप्रमुखाला बाल्जबूल म्हणतात तर कुटुंबातील सदस्यांना कितीतरी अधिक वाईट नावे ठेवतील!

सामायिक करा
मत्तय 10 MACLBSI