मत्तय 10:1-4
मत्तय 10:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला. तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
मत्तय 10:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही: शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान; फिलिप्प आणि बर्थलमय; थोमा आणि मत्तय जकातदार; अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय; शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले.
मत्तय 10:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत : पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत.
मत्तय 10:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व रोग व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी: पहिला पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार; अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व येशूला धरून देणारा यहुदा इस्कर्योत.