मत्तय 1:1-2
मत्तय 1:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ. अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले.
मत्तय 1:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची ही वंशावळी: अब्राहाम इसहाकाचा पिता होता, इसहाक याकोबाचा पिता, याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता
मत्तय 1:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी. अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले
मत्तय 1:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी: अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा.