मत्तय 1:1-17
मत्तय 1:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ. अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले. यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला. अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन, सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला. आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला. आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया, उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया, हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया, आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला. जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला. अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला. एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
मत्तय 1:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्राहामाचा पुत्र दावीदाचा पुत्र, येशू ख्रिस्ताची ही वंशावळी: अब्राहाम इसहाकाचा पिता होता, इसहाक याकोबाचा पिता, याकोब यहूदाह व त्याच्या भावांचा पिता होता, यहूदाह पेरेस व जेरहचा पिता, त्यांची आई तामार होती. पेरेस हेस्रोनचा पिता, हेस्रोन अरामचा पिता, अराम अम्मीनादाबाचा पिता, अम्मीनादाब नहशोनाचा पिता, नहशोन हा सल्मोनाचा पिता, सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता, इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती, शलोमोन रहबामाचा पिता, रहबाम अबीयाचा पिता, अबीया आसाचा पिता, आसा यहोशाफाटाचा पिता, यहोशाफाट योरामाचा पिता, योराम उज्जीयाहचा पिता, उज्जीयाह योथामाचा पिता, योथाम आहाजाचा पिता, आहाज हिज्कीयाचा पिता, हिज्कीयाह मनश्शेहचा पिता, मनश्शेह आमोनाचा पिता, आमोन योशीयाहचा, योशीयाह यखन्या व त्यांच्या भावांचा पिता होता, हे बाबेलमध्ये हद्दपार केले तेव्हा झाले. बाबेलमध्ये हद्दपार झाल्यावर: यखन्या शल्तीएलचा पिता, शल्तीएल जरूब्बाबेलाचे पिता, जरूब्बाबेल अबीहूदचा पिता, अबीहूद एल्याकीमचा पिता, एल्याकीम अज्जूरचा पिता, अज्जूर सादोकाचा पिता, सादोक याखीमचा पिता, याखीम एलीहूदाचा पिता, एलीहूद एलअज़ाराचा पिता, एलअज़ार मत्तानाचा पिता, मत्तान याकोबाचा पिता, याकोब योसेफाचा पिता, योसेफ मरीयेचा पती होता; मरीया, ज्यांना ख्रिस्त म्हणत त्या येशूची आई होती. अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
मत्तय 1:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी. अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले; यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला; अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन; सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय; आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला; शलमोनाला रहबाम; रहबामाला अबीया; अबीयाला आसा; आसाला यहोशाफाट; यहोशाफाटाला योराम; योरामाला उज्जीया; उज्जीयाला योथाम; योथामाला आहाज; आहाजाला हिज्कीया; हिज्कीयाला मनश्शे; मनश्शेला आमोन; आमोनाला योशीया; आणि बाबेलास देशांतर झाले त्या वेळी योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शल्तीएल झाला. शल्तीएलाला जरूब्बाबेल; जरूब्बाबेलाला अबीहूद; अबीहूदाला एल्याकीम; एल्याकीमाला अज्जुर; अज्जुराला सादोक; सादोकाला याखीम; याखीमाला एलीहूद; एलीहूदाला एलाजार; एलाजाराला मत्तान; मत्तानाला याकोब; आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरीयेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती. ह्याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या; आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
मत्तय 1:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी: अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा. दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ. बाबेल येथील हद्दपार अवस्थेच्या काळापासून येशूच्या जन्मापर्यंत पुढील वंशजांची नावे नमूद केली आहेत: यखन्या, शल्तिएल, जरुब्बाबेल, अबिहूद, एल्याकीम, अज्जुर, सादोक, याखीम, एलिहूद, एलाजार, मत्तान, याकोब व योसेफ. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला तिचा हा पती. अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दावीदपासून इस्राएली लोकांचे बाबेलला देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलला देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.