मलाखी 3:17-18
मलाखी 3:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “मी हे करीन त्या दिवशी ते माझे, म्हणजे माझे खासगीचे धन होतील, आणि जसा कोणी आपली सेवा करणारा आपला मुलगा याच्यावर दया करीत असतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट मनुष्य आणि चांगला मनुष्य यातील फरक तुम्हास कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील फरक तुम्हास समजेल.”
मलाखी 3:17-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “त्या दिवशी मी कृती करेन, ते लोक माझी मौल्यवान संपत्ती होतील; आणि ज्याप्रमाणे एखादा पिता आपली सेवा करणाऱ्या पुत्राची गय करतो, त्याप्रमाणे मी त्यांची गय करेन. मग नीतिमान व दुष्ट माणसे, त्याचप्रमाणे परमेश्वराची सेवा करणारे व सेवा न करणारे यातील फरक तुम्हाला दिसून येईल.”
मलाखी 3:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. मग तुम्ही वळाल, आणि नीतिमान व दुष्ट ह्यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा ह्यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.