मलाखी 2:14-16
मलाखी 2:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस. आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचाही जो आपल्या वस्राबरोबर म्हणजे पत्नीबरोबर हिंसेने वागतो त्याचाही मला तिटकार आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका.”
मलाखी 2:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही विचारता, “का?” कारण याहवेह तुम्ही व तुमच्या तारुण्यातील पत्नी मधील साक्षीदार आहेत. ती तुमची सहचारिणी आहे व तुमच्या वैवाहिक कराराद्वारे तुमची पत्नी आहे, तरीही तुम्ही तिचा विश्वासघात केला. तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका. याहवेह इस्राएलाचे परमेश्वर म्हणतात, “जिला संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य आहे, तिच्याविरुद्ध तो हिंसाचार करतो, तिचा तो तिरस्कार करतो व तिला घटस्फोट देतो.” म्हणून सावध राहा व विश्वासघात करू नका.
मलाखी 2:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर2 क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.”