मलाखी 1:6
मलाखी 1:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सेनाधीश परमेश्वर तुझ्याशी असे बोलतो, “मुले वडिलांना आणि सेवक आपल्या धन्याला मान देतो. मग मी, जो तुमचा पिता आहे, त्या माझा सन्मान कुठे आहे? आणि मी जर तुमचा धनी आहे, तर मग माझा परम आदर कुठे आहे? अहो याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही. पण तुम्ही म्हणता ‘तुझ्या नावाचा मान आम्ही कसा राखला नाही?’
मलाखी 1:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पुत्र आपल्या पित्याचा आदर करतो, नोकर आपल्या धन्याचा आदर करतो. जर मी तुमचा पिता आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे? मी जर धनी आहे, तर मला दिला जाणारा योग्य आदर कुठे आहे?” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. “ते तुम्ही याजक आहात, जे माझ्या नामाचा अनादर करतात. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्या नामाचा अनादर कसा केला?’
मलाखी 1:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणार्या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला?’