लूक 8:38-39 - Compare All Versions
लूक 8:38-39 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ज्या माणसातून भुते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की, मला आपणाजवळ राहू द्या; परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले, “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्ये केली ते सांगत जा.” मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्ये केली होती त्याची गावभर घोषणा करत फिरला.
लूक 8:38-39 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती, तो, मला तुमच्याबरोबर राहू दयावे, अशी येशूजवळ विनंती करीत होता, परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला, “तू आपल्या घरी परत जा व देवाने तूझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते साग.” मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या सबंध नगरांतून घोषित करत गेला.
लूक 8:38-39 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या माणसातून भुते निघाली होती, तो त्याला विनंती करीत होता, “मला आपल्याजवळ राहू द्या.” परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती महान कृत्ये केली ते जाहीर कर.” त्यानंतर येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते, ते तो नगरभर सांगत गेला.
लूक 8:38-39 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, “आपल्या घरी परत जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी जे काही केले आहे ते त्यांना सांग.” तेव्हा तो मनुष्य निघून गेला आणि येशूंनी त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट केली हे त्याने शहरात सर्व भागात जाऊन सांगितले.