लूक 7:47-50
लूक 7:47-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.” तेव्हा येशूने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?” मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”
लूक 7:47-50 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव मी तुला सांगतो, हिने दाखविलेल्या पुष्कळ प्रीतीमुळे तिच्या अनेक पापांची क्षमा करण्यात आली आहे. ज्याच्या थोड्या पापांची क्षमा होते, त्याची प्रीतीही थोडीच असते.” येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.” त्या ठिकाणी आलेल्या दुसर्या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?” येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले आहे; शांतीने जा.”
लूक 7:47-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.” मग त्याने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण?” मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”
लूक 7:47-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून मी तुम्हांला सांगतो, हिची पापे पुष्कळ असूनही त्यांची तिला क्षमा करण्यात आली आहे; कारण तिची प्रीती महान आहे. परंतु ज्याला थोडी क्षमा मिळाली आहे, तो थोडी प्रीती करतो.” मग त्याने तिला म्हटले,”तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.” तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा आहे तरी कोण?” त्यानंतर त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”