लूक 6:29-30 - Compare All Versions
लूक 6:29-30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही कर; आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्याकडे ते परत मागू नकोस.
लूक 6:29-30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका. जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको.
लूक 6:29-30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो तुझ्या एका गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा कोट हिरावून घेतो त्याला तुझा शर्टदेखील घेऊन जाण्यास विरोध करू नकोस. जो कोणी तुझ्याजवळ मागतो, त्याला दे आणि जो तुझे हिरावून घेतो, त्याच्याकडून ते परत मागू नकोस.
लूक 6:29-30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली, तर त्यांच्यापुढे दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा काढून घेतला, तर त्यांना तुमची बंडीही घेण्यास मनाई करू नका. जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि जो तुमचे घेतो, त्याची परत मागणी करू नका.