लूक 23:32-34
लूक 23:32-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले. आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
लूक 23:32-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंबरोबर आणखी दोन माणसे, दोघेही अपराधी होते, त्यांनाही जिवे मारण्याकरिता नेण्यात आले. जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
लूक 23:32-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्याबरोबर दुसर्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’
लूक 23:32-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूबरोबर दुसऱ्या दोघा जणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसावर खिळण्यासाठी नेले. ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले. [तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.]