लूक 20:27-30
लूक 20:27-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत. सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला. नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले.
लूक 20:27-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पुनरुत्थान नाही असे मानणार्या सदूकी लोकांपैकी काहीजण येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. आता एका कुटुंबात सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले पण काही मूलबाळ न होता, तो मरण पावला. मग दुसर्या आणि तिसर्यानेही तिच्याशी लग्न केले आणि याप्रमाणे ते सातही भाऊ संतान न होताच मरण पावले.
लूक 20:27-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘एखाद्याचा भाऊ’ आपली बायको जिवंत असता ‘निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ बरे, सात भाऊ होते; त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली व तो निःसंतान असा मेला. मग दुसर्याने ती केली व तो निःसंतान असा मेला.
लूक 20:27-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले, ‘गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ त्याची पत्नी जिवंत असता निःसंतान निधन पावला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा. एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला. मग दुसऱ्याने तिच्याबरोबर विवाह केला व तिसऱ्यानेदेखील.