YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19:4-6 - Compare All Versions

लूक 19:4-6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता. मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत-स्वागत केले.

सामायिक करा
लूक 19 IRVMAR

लूक 19:4-6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते. येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, “जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे.” तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने त्यांचे आनंदाने स्वागत केले.

सामायिक करा
लूक 19 MRCV

लूक 19:4-6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला; कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.

सामायिक करा
लूक 19 MARVBSI

लूक 19:4-6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी तो एका उंबराच्या झाडावर चढला कारण येशू त्या वाटेने जाणार होता. येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.

सामायिक करा
लूक 19 MACLBSI