लूक 17:20-21
लूक 17:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही. पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.”
लूक 17:20-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही परूश्यांनी विचारले, “परमेश्वराचे राज्य केव्हा येईल?” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “दृश्य रूपाने नजरेस पडेल अशा रीतीने परमेश्वराचे राज्य येत नाही, परमेश्वराचे राज्य, ‘ते येथे’ किंवा ‘ते तिथे’ आहे, असे लोक म्हणणार नाहीत, कारण परमेश्वराचे राज्य तुम्हामध्ये आहे.”
लूक 17:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही; ‘पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे!’ असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
लूक 17:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाचे राज्य केव्हा येईल, असे परुश्यांनी त्याला विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही. ‘पाहा, ते येथे आहे’ किंवा ‘ते तेथे आहे’ असे म्हणता येत नाही. पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”