लूक 13:3-5
लूक 13:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल. किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरूशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”
लूक 13:3-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हाला सांगतो, तसे मुळीच नाही. जर तुम्हीही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल. किंवा शिलोआमाचा बुरूज जेव्हा त्या अठरा लोकांवर पडला आणि ते मरण पावले, तर तुम्हाला असे वाटते काय की, यरुशलेममध्ये राहणार्या सर्वांपेक्षा ते अधिक दोषी होते? नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.”
लूक 13:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.” किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”
लूक 13:3-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तुम्हांला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहमधील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते, असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते. मात्र जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”