लूक 11:9-12
लूक 11:9-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्यास मिळेल. जो कोणी शोधतो त्यास सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल?
लूक 11:9-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल. “तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल? किंवा जर त्याने अंडे मागितले, तर त्याला विंचू द्याल?
लूक 11:9-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल?
लूक 11:9-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळते; जो कोणी शोधतो त्याला सापडते; जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल?