YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 11:24-28

लूक 11:24-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्याबाहेर येतो व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्यास ती विश्रांती मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ‘मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’ तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्यास ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते. नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे घेतो आणि ते त्या घरात जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.” तो या गोष्टी बोलला तेव्हा असे घडले की, गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्यास म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस.” परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!”

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:24-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो आणि ती त्याला सापडत नाही. त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.” येशू बोलत असताना त्या गर्दीतील एक स्त्री ओरडून म्हणाली, “धन्य तुझी माता, जिने तुला जन्म दिला, दूध पाजले व तुझे पोषण केले!” त्याने उत्तर दिले, “परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत.”

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:24-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाल्यास तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’ आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते. नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आत शिरून तेथे राहतात; मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते.” मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!” तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”

सामायिक करा
लूक 11 वाचा

लूक 11:24-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचे ठिकाण शोधत हिंडतो आणि ते मिळाले नाही म्हणजे म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’ तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा अधिक दुष्ट असे सात आत्मे बरोबर आणतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.” तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील एक स्त्री त्याला उच्च स्वरांत म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जिने स्तनपान देऊन तुला वाढवले ती धन्य !” तथापि तो म्हणाला, “त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य.”

सामायिक करा
लूक 11 वाचा