लूक 1:11-13
लूक 1:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला. परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव.
लूक 1:11-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा जखर्याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला. त्याला पाहताच जखर्याह चकित आणि भयभीत झाला. पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव.
लूक 1:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, “जखर्या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव.
लूक 1:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
धूप जाळले जात असताना प्रभूचा दूत वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या विस्मित व भयभीत झाला. परंतु देवदूताने त्याला म्हटले, “जखऱ्या, भिऊ नकोस! तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान असे ठेव.