YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26:1-13 - Compare All Versions

लेवीय 26:1-13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तुम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे. तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल, तर नेमलेल्या काळात तुमच्याकरता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल; तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हांला कोणाची भीती राहणार नाही; मी देशातून हिंस्र पशू नाहीसे करीन, आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही. तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील. तुमच्यातले पाच जण शंभरांना, शंभर जण दहा हजारांना पळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्यापुढे तलवारीने पडतील. मी तुमच्यावर कृपादृष्टी करून तुम्हांला फलद्रूप व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन. तुम्ही बरेच दिवस साठवून ठेवलेले धान्य खाल व नवीन धान्य आल्यामुळे जुने बाहेर काढाल. मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये वावरेन; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्ही मिसर्‍यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी तुमची जोखडे मोडून तुम्हांला ताठ मानेने चालवले आहे.

सामायिक करा
लेवीय 26 MARVBSI

लेवीय 26:1-13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे. तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या, तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत रहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत रहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित रहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. तुमच्यातील पाच जण शंभरांना व शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल. मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन; तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे!

सामायिक करा
लेवीय 26 IRVMAR

लेवीय 26:1-13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे. “ ‘माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल, तर मी हंगामात तुमच्यासाठी पाऊस पाठवेन आणि जमीन पीक देईल आणि झाडे फळ देतील. द्राक्षमळ्याची कापणी होईपर्यंत तुझी मळणी सुरूच राहील आणि द्राक्षांची कापणी पेरणी होईपर्यंत चालू राहील आणि पोटभर अन्न खाऊन तुम्ही तृप्त व्हाल आणि देशात सुरक्षित राहाल. “ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील. तुम्हातील पाचजण शंभरांचा व शंभर दहा हजारांचा पाठलाग करून सर्व शत्रूंचा पराजय करतील आणि तुमचे शत्रू तलवारीने तुमच्यासमोर पडतील. “ ‘मी तुमच्यावर कृपादृष्टी करेन, तुम्हाला बहुगुणित करेन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करेन. तुम्ही अजूनही मागील कापणी खात राहाल, तुमच्या शेतात इतके भरपूर पीक येईल की, ते साठविण्यासाठी तुम्हाला जुने धान्य बाहेर काढावे लागेल. मी तुमच्यामध्ये वस्ती करेन व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही. मी तुमच्यामध्ये चालेन; मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे.

सामायिक करा
लेवीय 26 MRCV