YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 19:19-37

लेवीय 19:19-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका. दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नका. भिन्न सूत एकत्र करून विणलेला कपडा अंगात घालू नका. एखाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरून मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीरसंबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये. हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा; आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्यास क्षमा होईल. तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळझाडे लावाल, तेव्हा फळझाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊ नयेत. पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी. मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे! तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही काही जादूटोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्याच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका. आपल्या डोक्याला घेर ठेवू नका; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका. मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे! तू आपल्या मुलीला वेश्या करुन भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका. तुम्ही माझे शब्बाथ, काम न करता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे! सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका; त्यांच्यामागे लागू नका; ते तुम्हास अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे! वडीलधाऱ्या मनुष्यांना मान द्या; वृद्ध मनुष्य घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे! कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका. तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास स्वदेशीय मनुष्यासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एकेकाळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे! लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका. तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले! “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे!”

सामायिक करा
लेवीय 19 वाचा

लेवीय 19:19-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“ ‘माझ्या आज्ञा पाळा. “ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये. “ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका. “ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत. “ ‘एखादा मनुष्य एखाद्या गुलाम स्त्रीसोबत झोपेल जी एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, परंतु ज्याला खंडणी दिली गेली नाही किंवा तिला स्वातंत्र्य दिले गेले नाही, तर त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे. तरीही त्यांना मृत्युदंड दिला जाऊ नये, कारण तिला मुक्त केले गेले नाही. त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे. त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल. “ ‘तुम्ही आपल्या देशात प्रवेश कराल व तिथे सर्व प्रकारची फळझाडे लावाल. तेव्हा पहिली तीन वर्षे त्या झाडांची फळे खाऊ नका, कारण ती बेसुंती समजावी व तुम्हाला निषिद्ध आहेत, चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे. परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. “ ‘तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नये. “ ‘तुम्ही जादूटोणा करू नये किंवा शकुन पाहू नये. “ ‘तुम्ही आपले केस कापतांना बाजूचे केस कापून गोलाकार देऊ नये किंवा आपल्या दाढीचे टोक कापू नये. “ ‘मृत्यू पावलेल्यासाठी तुम्ही आपल्या शरीरावर जखमा करून घेऊ नये किंवा शरीर गोंदून घेऊ नये. मी याहवेह आहे. “ ‘तुम्ही आपल्या कन्यांना वेश्याकर्माला लावून त्यांना भ्रष्ट करू नये, नाहीतर देश व्यभिचारी होऊन दुष्टाईने भरून जाईल. “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे. “ ‘तुम्ही शकुनविद्या, ज्योतिष किंवा चेटक्यांची सल्लामसलत घेऊन स्वतःला भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. “ ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे. “ ‘तुम्ही तुमच्या देशात असलेल्या परदेश्यांचा गैरफायदा घेऊ नये. त्यांच्याशी वाईट वागू नये. जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. “ ‘लांबी, वजन किंवा प्रमाण मापण्यात अप्रामाणिक मापे वापरू नका. तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा आणि हीन उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे. “ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ”

सामायिक करा
लेवीय 19 वाचा

लेवीय 19:19-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

माझे विधी पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातींच्या पशूंशी संकर होऊ देऊ नकोस; दोन जातींचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नकोस; भिन्न सुतांनी विणलेला कपडा अंगात घालू नकोस. जी स्त्री दासी असून एखाद्या पुरुषाशी वाग्दत्त झाली असेल, पण खंडणी भरून अद्याप मुक्त झाली नसेल, तिच्याशी कोणी संभोग केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; तथापि तिची मुक्तता झालेली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये. त्या पुरुषाने दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराकडे आपले दोषार्पण म्हणजे एक मेंढा दोषार्पणासाठी आणावा; आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याच्या द्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल. तुम्ही आपल्या देशात जाऊन पोहचल्यावर खाण्यासाठी हरतर्‍हेची फळझाडे लावाल तेव्हा त्यांची फळे निषिद्ध1 समजावीत; तीन वर्षेपर्यंत ती तुम्हांला निषिद्ध1 होत, ती खाऊ नयेत; पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकारस्मरणार्थ पवित्र समजावीत. मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका; तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकुनमुहूर्त पाहू नका. आपल्या डोक्याला घेरा राखू नका. आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नका. कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे. तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नकोस; नाहीतर वेश्यागमनामुळे देश अतिदुष्टपणाने व्यापून जाईल. तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे. पंचाक्षर्‍यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका; मी परमेश्वर तुमचा देव आहे. पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे. कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका. तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वत:सारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे. न्याय करण्यात, मोजणी करण्यात, तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करू नका. तुमच्याजवळ खरी तागडी, खरी वजने, खरा एफा2 व खरा हिन2 असावा; ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे; म्हणून तुम्ही माझे सर्व विधी आणि सर्व नियम मान्य करून पाळावेत; मी परमेश्वर आहे.”

सामायिक करा
लेवीय 19 वाचा