YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 18:24-30

लेवीय 18:24-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले. त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहीवाशांचा त्याग करीत आहे. ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्ये करु नये. कारण तुमच्या पूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्ये केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील. जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; अशी भयंकर अमंगळ कृत्ये करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे!

सामायिक करा
लेवीय 18 वाचा

लेवीय 18:24-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“ ‘अशा प्रकारच्या कोणत्याही अमंगळ गोष्टी करून तुम्ही स्वतःला अपवित्र करून घेऊ नये, कारण ज्या राष्ट्रात मी तुम्हाला पाठवित आहे, ती राष्ट्रे या गोष्टींनी भ्रष्ट झाली आहेत. भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे. म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत, ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, त्या देशातील रहिवाशांनी अशा ओंगळ गोष्टी सतत केल्या म्हणून तो देश भ्रष्ट झाला. जर तुम्ही ही भूमी भ्रष्ट कराल, तर ती तुम्हाला ओकून टाकेल, जसे तुमच्या पूर्वी असलेल्या राष्ट्रांना तिने ओकून टाकले होते. “ ‘या ओंगळ कृत्यांपैकी एकदेखील कृत्य जो करेल, त्याला या राष्ट्रातून बहिष्कृत केले जाईल. म्हणून तुम्ही जात आहात, तेथील लोकांच्या ओंगळ कृत्यांचे अनुकरण करून तुम्ही स्वतःस भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

सामायिक करा
लेवीय 18 वाचा

लेवीय 18:24-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरून घालवणार आहे, ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत. त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे.1 ह्याकरता तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत. स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यांच्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्ये करू नयेत; कारण तुमच्यापूर्वी ह्या देशात राहणार्‍या लोकांनी असली सर्व अमंगळ कृत्ये केल्यामुळे हा देश भ्रष्ट झाला आहे. तुमच्यापूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला2 तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये.3 जे कोणी असली अमंगळ कृत्ये करतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा. ही जी आज्ञा मी तुम्हांला केली आहे, ती तुम्ही पाळावी; तुमच्यापूर्वी प्रचलित असलेल्या अमंगळ चालीरीतींप्रमाणे तुम्ही चालू नये व त्यांच्यामुळे अशुद्ध होऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”

सामायिक करा
लेवीय 18 वाचा