लेवीय 13:45-46
लेवीय 13:45-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांस इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे. जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
लेवीय 13:45-46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
असा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे. जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.
लेवीय 13:45-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावेत; त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावेत, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि ‘अशुद्ध, अशुद्ध’ असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.